बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आजवर झालेल्या सन्मानाचं संग्रहालयात रुपांतर केलंय. त्यांच्या याच संग्रहालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या बारामती भेटीमध्ये भेट दिली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधानांना संग्रहालयाची माहिती दिली.
शरद पवार. महाराष्ट्राच्या राजकारणातल एक मोठं नाव. पण पवार यांनी साहित्यापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात जाणकार म्हणून रुची दाखवली आणि म्हणूनच समाजातल्या सर्वच क्षेत्रात त्यांचा सन्मान होताना त्या पुरस्कारांचाच सन्मान होत गेला.
प्रत्येक सन्मानाचं पवारांनी संग्रहालयात रुपांतर केलंय. शरद पवार. देशातलं एक बहुआयामी नेतृत्व.40 वर्षांपासून अधिक काळ राजकारणात असलेल्या या मुरब्बी राजकारण्यानं एक अनोखा छंद जोपासलाय. तो म्हणजे त्यांना आत्तापर्यंत मिळालेल्या भेटवस्तू जपून ठेवण्याचा. त्यासाठी त्यांनी एक भलं मोठं संग्रहालयच उभारलंय. या संग्रहालयात अगदी पेनपासून ते विदेशातल्या आगळ्यावेगळ्या भेटवस्तूही पहायला मिळतात. इतकंच काय तर पवारांचे दुर्मिळ फोटोही या संग्रहालयात पहायला मिळतात.
पवारांच्या आठवणी या बेफाट असतात अस नेहमी त्याचे निकटवर्तीय म्हणतात.. पण या संग्रहालयाच्या निमित्तानं आठवणींचा संग्रह हा सर्वासांठी खुला होतोय .
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.