औरंगाबाद : घरवापसी हा हिंदू परंपरापासून दुरावलेल्यांना स्वधर्मात आणण्याचा उपक्रम आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलंय,, यावर विस्तृतपणे बोलतांना मोहन भागवत म्हणाले, आम्हीच खरे इतर सर्व चूक,याचवृत्तीतून अऩेक हिंदूना त्यांच्या रुढी-परंपरेपासून दूर नेलं गेलं. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना पुन्हा स्वधर्मात आणलं जातं आहे, असं त्यांनी घरवापसीसंदर्भात म्हटलंय. यावरून पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक घर वापसीचा उपक्रम वेगानं राबवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.
तसेच हिंदू कुणाच्याही विरोधात नाही, मात्र हिंदूविरोधी मंडळींच्या प्रतिकारासाठी आपल्याला सज्ज रहावं लागेलं, असं आवाहनही भागवत यांनी यावेळी उपस्थित स्वयंसेवकांना केलं. औरंगाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देवगिरी महासंगम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, याच कार्यक्रमात भागवत बोलत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.