नवी मुंबई : मुंबई पाठोपाठ आता नवी मुंबईतही मेट्रो रेल्वे लवकरच धावणार आहे. सिडकोच्या मार्फत सुरु होणा-या मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे.
मेट्रोच्या पहिल्या फेजमध्ये 11 किलोमीटरचा मार्ग असणार आहे.. पेंधर ते बेलापूर दरम्यान 11 स्टेशन्स असतील. या मार्गातील तळोजा परिसरात रेल्वे ट्रॅक येत असल्यानं नवीन टेक्नॉलॉजी वापरुन वायर ब्रीज बांधण्यात येणार आहे.
डिसेंबर 2016 पर्यंत नवी मुंबईत मेट्रो धावेल, असा विश्वास सिडकोनं व्यक्त केलाय. मुंबत मेट्रो सुरु झाल्याने २१ शतकातील मुंबई म्हणून नवी मुंबईचा उल्लेख करण्यात येतो. त्या सीटीत मेट्रो कधी सुरु होणार याची विचारणा होत होती. त्यामुळे आता याला पूर्णविराम मिळालय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.