नवी मुंबई विमानतळ उभारणीचा अडथळा दूर

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा अडथळा दूर झाला आहे. १६ गावातील गावक-यांनी विमानतळासाठी आपल्या जमिनी देण्यास संमती दिली असल्याने आता आगामी वर्षी विमानतळाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. 

Updated: Nov 26, 2014, 07:38 PM IST
नवी मुंबई विमानतळ उभारणीचा अडथळा दूर title=

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा अडथळा दूर झाला आहे. १६ गावातील गावक-यांनी विमानतळासाठी आपल्या जमिनी देण्यास संमती दिली असल्याने आता आगामी वर्षी विमानतळाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. 

पुर्नवसन पॅकेज, स्थानिकांना रोजगार, स्थानिकांच्या मुलांना प्रतिष्ठीत इंन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण या बाबी घोषीत केल्यानंतर गावक-यांनी पसंती देत आपल्या जमिनी देण्याचे समंत्री पत्र प्रकल्पग्रस्तांनी रायगड जिल्हाधिका-यांकडे दिले आहेत. 

विमानतळाच्या उभारणीसाठी एकूण २१०० हेक्टर जमिनीची गरज असून यातील ६५० हेक्टर जमिन ही येथील प्रकल्पग्रस्तांची आहे. १६ गावातील शेतक-यांनी सिडकोला जमिनी देण्यास आणि गावाचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यास तीव्र विरोध केला होता. या गावक-यांना जमिनी देण्यास राजी करण्यासाठी सिडको गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न करत होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.