नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमाराला सिक्युरिटी व्हँनवर दरोडा टाकून तब्बल ५८ किलो सोनं लुटण्यात आलंय.
मुंबईहून शिरपूरच्या दिशेन ६० किलो सोनं घेऊन जाणाऱ्या वाहनाला वाडीवऱ्हे गावाजवळ अडवण्यात आलं. अंबर दिवा लावून आलेल्या कार मधल चार पाच जणांनी पोलीस असल्याची बतावणी करून ही व्हॅन थांबवली. व्हॅन थांबताच दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवून जवळपास सोळा कोटींचं सोनं घेऊन पसार झाले.
याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथकं नेमण्यात आलीयत. सुरक्षेच्या दृष्टीने व्हँनमध्ये सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले होते मात्र ते बंद असल्यानं तपासात अडचणी येतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.