पुणे : दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यातील काहीठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन-तीन दिवसांत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागराचा पश्चिम-मध्य भाग, दक्षिण ओडिसालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी अधिक स्पष्ट झाल्याने दिलासादायक पावसाची शक्यता आहे.
गोवा आणि कोकणता मान्सून सक्रिय झाला आहे, कोकणातही काही ठिकाणी पाऊस होतोय, कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे १०३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
मराठवाड्यामध्ये गुरुवारी सकाळी आठपर्यंत गेल्या २४ तासांत सरासरी २.१२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मराठवाड्यामध्ये औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातही काहीसा पाऊस झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.