राज्य सरकारला 'मॅट'चा दणका, 'त्या'सात तहसीलदारांच्या निलंबनाला स्थगिती

नाशिकमधील धान्य घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 7 तहसीलदारांना मॅटनं मोठा दिलासा दिलाय. या 7 तहसीलदारांच्या निलंबन आदेशाला मॅटनं स्थगिती दिलीय. 

Updated: Jun 16, 2015, 05:43 PM IST
राज्य सरकारला 'मॅट'चा दणका, 'त्या'सात तहसीलदारांच्या निलंबनाला स्थगिती title=

नाशिक: नाशिकमधील धान्य घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 7 तहसीलदारांना मॅटनं मोठा दिलासा दिलाय. या 7 तहसीलदारांच्या निलंबन आदेशाला मॅटनं स्थगिती दिलीय. 

एवढंच नव्हे तर त्यांची आहे त्याच पदावर पुनर्स्थापना करण्याचे निर्देशही मॅटनं दिलेत. मॅटच्या या आदेशामुळं राज्य सरकारला मोठा दणका बसलाय, तर निलंबित तहसीलदारांना मात्र दिलासा मिळालाय.

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रकरणी सात तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सात तहसीलदारांच्या निलंबनाची घोषणा केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.