सांगली : जमिनीच्या वादातून सांगलीत एकाने आपल्या जन्मदात्या आईसह पत्नी आणि दोन मुलींची हत्या केलीये. भारत कुंडलिक इरकर असं या आरोपीचं नाव आहे.
सांगलीतील जत तालुक्यातील कुडनूर गावात ही धक्कादायक घटना घडलीये. हत्येनंतर भारत स्वताहून पोलिसांना शरण आला आणि चारही खून केल्याची त्यानं कबुली दिली.
जमिनीवरुन झालेल्या वादात त्यानं मध्यरात्री धारधार शस्त्रानं या चारही महिलांवर वार केले त्यात चौघींचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सुशीला कुंडलिक इरकर, सिंधुबाई भारत इरकर, रुपाली भारत इरकर आणि राणी भारत इरकर या महिलांचा समावेश आहे.