Amitabh Bachchan KBC 16 : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती 16' हा लोकप्रिय शो पैकी एक आहे. या शोकडे सगळे बुद्धीचा स्त्रोत म्हणून पाहतात. या शोमधून असे अनेक स्पर्धक येऊन गेले ज्यांनी आतापर्यंत लाखो रुपये जिंकले आहेत. या सीजनची सुरुवात ही अमिताभ बच्चन करतात म्हणजेच ते या शोचं सुत्रसंचालन करताना दिसतात.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या एपिसोडमध्ये हॉट सीटवर चांदनी चौधरी बसल्या होत्या. चांदनी दिल्लीच्या लोकप्रिय FMS च्या विद्यार्थी आहेत आणि 2023 मध्ये त्यांना सायक्लोथॉनमध्ये कास्य पदक मिळालं होतं. तर तिचं स्टार्टअप 'सारथी' च्या फंडसाठी ती केबीसीमध्ये आली होती. खेळाची सुरुवात होताच अमिताभ बच्चन यांनी चांदनी चौधरीच्या समोर 3000 रुपयांसाठी एक प्रश्न विचारला. प्रश्न काय होता तर 'अवधी जेवणातील 'ताहरी ' हा पदार्थ कोणत्या राज्याशी संबंधित आहे?' यावर चांदनीने 'उत्तर प्रदेश' असं उत्तर दिलं.
याच प्रश्नावर चर्चा करत असताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की 'ताहरी' एक प्रकारची तांदळापासून बनवण्यात आलेला सर्वोत्त्म पदार्थ आहे. हा बिर्याणीसारखाच एक पदार्थ आहे. पण याला थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवतात. त्यानं हा देखील खुलासा केला की सुरुवातीला त्यांना 'ताहरी' हा पदार्थ खूप आवडायचा. पण आता त्यांनी भात खाणं पूर्णपणे बंद केलं आहे.
जेव्हा चांदनी म्हणाली की 'भात हा तिचा आवडता प्रकार आहे. तर त्यावर उत्तर देत बिग बी म्हणाले, हातानं डाळ-भात खाण्याची जी मज्जा आहे, ती दुसऱ्या कोणत्या जेवणात येत नाही. खेळ आणि मस्करीच्या या चर्चांमध्ये खेळाला पुढे घेऊन गेली. आता सगळ्यांचं लक्ष याकडे लागलं आहे की ती किती पुढे जाते आणि तिच्या स्टार्टअपसाठी किती पैसे जमवू शकते आणि आपल्या स्टार्टअपसाठी किती पैसे जिंकणार.'
हेही वाचा : 'मला धडधड होत होती अन् मी...'; जुनैद खानचा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अशी होती आमिर खानची प्रतिक्रिया
ही पहिली वेळ नाही जेव्हा अमिताभ यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी किंवा त्यांना कोणती गोष्ट आवडते याविषयी सांगितलं आहे. या आधी देखील त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी या शोमध्ये खुलासे केले आहेत.