केडीएमसी : भाजपने दिली शिवसेनेला महापौरपदासाठी ऑफर

 कल्याणमधील कोंडी फोडण्यासाठी भाजपने शिवसेनेला नवा फॉर्मुला दिला आहे. कल्याणमधील महापौरपद रोटेशनमध्ये विभागून द्यावे असा प्रस्ताव भाजपकडून शिवसेना दिला गेल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने पीटीआयशी बोलताना सांगितले. 

PTI | Updated: Nov 4, 2015, 10:21 PM IST
केडीएमसी : भाजपने दिली शिवसेनेला महापौरपदासाठी ऑफर title=

 कल्याण :  कल्याणमधील कोंडी फोडण्यासाठी भाजपने शिवसेनेला नवा फॉर्मुला दिला आहे. कल्याणमधील महापौरपद रोटेशनमध्ये विभागून द्यावे असा प्रस्ताव भाजपकडून शिवसेना दिला गेल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने पीटीआयशी बोलताना सांगितले. 

शिवसेनेने निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये विश्वास व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेनेने चार वर्ष महापौरपद घ्यावे आणि भाजपला एका वर्षासाठी महापौरपद द्यावे असा प्रस्ताव भाजपकडून पाठविण्यात आला आहे.  तर स्थायी समिती अध्यक्षपद हे भाजपला तीन वर्षांसाठी द्यावे आणि त्यानंतर दोन वर्ष शिवसेनेने घ्यावे असाही प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे भाजप नेत्याने सांगितले. 

औरंगाबाद महापालिकेत अशा प्रकारचा सत्ता विभाजनाचा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. या ठिकाणी सेनेने चार वर्षांसाठी महापौरपद घेतले आहे आणि भाजप एका वर्षासाठी महापौर पद स्वीकारणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.