उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली का? महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय?

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना  सहानुभूती मिळाली का? जाणून घेऊया एक्झिट पोलच्या माध्यमातून

वनिता कांबळे | Updated: Nov 20, 2024, 08:21 PM IST
उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली का? महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय? title=

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार का असा  AI सर्व्हे काही दिवसांपूर्वी घेण्यात आाला होता. या सर्व्हेत 45 टक्के लोकांनी सहानुभूती मिळणार नसल्याचं सांगितलंय. तसेच 35 टक्के लोकांनी सहानुभूती मिळणार असं सांगितले होते. तर,  20 टक्के लोकांनी सांगता येत नसल्याचं म्हणत तटस्थ भूमिका घेतली होती. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मदतानांतर घेण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून जाणून घेऊया उद्धव ठाकरेंना किती टक्के सहानुभूती मिळाली? महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी झी मिडियानं महा AI सर्वे केला होता. शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल का असा प्रश्न सर्वेतून राज्यातील जनतेला विचारण्यात आला होता. त्याला 35 टक्के लोकांनी सकारात्कम प्रतिसाद दिला. त्यात  35 टक्के जनतेला वाटतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल तर 45 टक्के लोकांना ठाकरेंना सहानुभूती मिळणार नसल्याचं वाटल होत. तर, 20 टक्के लोकांनी सांगता येत नाही अशी मतं मांडली. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूतीबाबत वेगळेच चित्र पहायला मिळाले आहे. 50  टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंना सहानभूती मिळालेली नाही असं म्हंटल आहे.  30 टक्के लोकांचे म्हणणे हो असं आहे. तर, 20 टक्के सांगू शकत नाही असं म्हणाले. 

महाराष्ट्रात त्रिशंकू कौल येण्याचा झीनियाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात महायुती, मविआला स्पष्ट बहुमत नसेल.  महायुतीला 129 ते 159 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर,   मविआला 124 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज आहे.