हिवरेबाजार चालतं बोलतं विद्यापीठ-मुनगंटीवार

अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवरे बाजारला भेट दिली. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केल्यानंच हिवरेबाजारचा सर्वांगीण विकास झाला असून, गाव खऱ्या अर्थाने आदर्श झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले. 

Updated: Oct 16, 2016, 04:22 PM IST
हिवरेबाजार चालतं बोलतं विद्यापीठ-मुनगंटीवार title=

अहमदनगर : अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवरे बाजारला भेट दिली. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केल्यानंच हिवरेबाजारचा सर्वांगीण विकास झाला असून, गाव खऱ्या अर्थाने आदर्श झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले. 

चंद्रपूर जिल्यातील २७ गाव आदर्श करायची आहेत. त्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा घेण्यासाठी हिवरेबाजारला आल्याचं त्यांनी सांगितलं.  यावेळी त्यांच्यासोबत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदेही उपस्थित होते.  

जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी मंत्री महोदयांचं खास स्वागत केलं. हिवरेबाजारमधील विकास कामांबरोबरच सिंचन व्यवस्थापन, दुग्ध व्यवस्थापन आणि वन विभागाच्या कामांची पाहणी त्यांनी केली. 

हिवरेबाजार हे आदर्श ग्राम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चालतंबोलतं विद्यापीठ असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.