भंडारा-गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का

भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. गोंदिया जिल्हापरिषदेत सत्तेत असणाऱ्या भाजपला ५३ पैकी फक्त १८ जागांवर समाधान मानावं लागलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १९ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्यात. 

Updated: Jul 7, 2015, 08:49 AM IST
भंडारा-गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का title=

गोंदिया: भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. गोंदिया जिल्हापरिषदेत सत्तेत असणाऱ्या भाजपला ५३ पैकी फक्त १८ जागांवर समाधान मानावं लागलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १९ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्यात. 

सर्व पक्ष वेगवेगळे लढल्यामुळं जिल्हापरिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीय. तर भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजूनही मतमोजणी सुरू आहे. 

पण सुरवातीच्या निकालात राष्ट्रवादीला १५, काँग्रेसला १९ आणि भाजपला फक्त १३ जागा मिळाल्यात, तर शिवसेनेला १ तर अपक्षांना ४ जागांवर विजय मिळवण्यात यश आलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.