'गोकूळ'चे संचालक सुरेश पाटील यांचा अपघाती मृत्यू

येथील 'गोकूळ' दूध या संस्थेचे संचालक सुरेश पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. पाटील हे कुटुंबीयांसह यात्रेसाठी गडहिंग्लजला गेले होते. तिथून परत येताना रात्री त्यांच्या गाडीला अपघात झाला.

Updated: May 9, 2015, 09:33 AM IST
'गोकूळ'चे संचालक सुरेश पाटील यांचा अपघाती मृत्यू  title=

कोल्हापूर : येथील 'गोकूळ' दूध या संस्थेचे संचालक सुरेश पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. पाटील हे कुटुंबीयांसह यात्रेसाठी गडहिंग्लजला गेले होते. तिथून परत येताना रात्री त्यांच्या गाडीला अपघात झाला.

या अपघातात त्यांच्या पत्नी, मुलगा, सून आणि नात जखमी झाले आहेत. पाटील हे कुटुंबियांसह यात्रेसाठी गडहिंग्लजला गेले होते. तिथून परत येताना रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास महे गावाजवळ हा अपघात झाला. 

भोगावती तुळशी नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांची स्कॉर्पिओ गाडी धडकली आणि अपघात झाला. अपघातात पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. पाटील १५ वर्षं 'गोकूळ'च्या संचालकपदी होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.