दुष्काळ नसतानाही मदत केली, दानवेंचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलीय.

Updated: Jan 20, 2017, 10:37 PM IST
दुष्काळ नसतानाही मदत केली, दानवेंचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ  title=

बुलडाणा : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलीय. गेल्यावर्षी दुष्काळ नसतानाही, आम्ही शेतक-यांना दुष्काळी मदत मिळवून दिली असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय.

बुलढाण्यात बोलताना त्यांनी शेतक-यांच्या जखमेवर हे मीठ चोळलं. दरम्यान, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल बोलतानाही दानवेंची जीभ घसरली. सोनियांना खाली न बघता भाषण करता येत नाही, अशी टीका त्यांनी केली.