आज होणार घरोघरी गौरीचं आगमन

गणपती उत्सवात कोकणात विविध समाज्याच्या संस्कृती पहायला मिळतात. गणेशोत्सवात रंगत आणली जाते ती गौरी आगमनानं. कोकणात ठिकठिकाणी गौरीचं आगमन धुमधडाक्यात करण्यात येतं. कोकणात कुणबी समाजाच्या महिला गौरी आगमन अनोख्या पद्धतीनं करतात.

Updated: Sep 8, 2016, 10:11 AM IST
आज होणार घरोघरी गौरीचं आगमन title=

मुंबई : गणपती उत्सवात कोकणात विविध समाज्याच्या संस्कृती पहायला मिळतात. गणेशोत्सवात रंगत आणली जाते ती गौरी आगमनानं. कोकणात ठिकठिकाणी गौरीचं आगमन धुमधडाक्यात करण्यात येतं. कोकणात कुणबी समाजाच्या महिला गौरी आगमन अनोख्या पद्धतीनं करतात.

पाणवठ्यावरुन गौरीच्या मुखवट्याची गौरी घरी आणण्याची परंपरा आहे. गौरी आणताना आगमनाची रंगतदार गाणी गुणगुणत गौरीचं आगमन होतं. गौरी आगमनाबरोबर गणपतीची अनोख्या पद्धतीने आराधना करण्याची परंपरा पहायला मिळते. कोकणात विशेषत ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईच आगमन होतं. कोकणात गौरीसाठी आज गोड नैवेद्य केला जातो तर उद्या सर्वत्र तिखट सण अर्थात गौरीला तिखट नैवेद्य दाखवला जातो. आज गौराईचे आगमन आणि उद्या रात्र भर गौराईचा जागर केला जाणार आहे. गौरीच्या मुखवट्यासोबत पाणवठ्यावरच्या खड्यांच्या गौरी ताम्हनात घरी आणल्या जातात. कुणबी समाजात या गौरी घरी आणत असताना खास गौरीची गाणी म्हटली जातात. गौरीचा मुखवटा धरुन तो पाणवठ्यावरुन घरापर्यंत सुहासीनी घेवून येतात.  घराच्या उंबऱ्यावर आलेल्या गौरीचं धुमधडाक्यात स्वागत होतं आणि गौरी आगमनानं गणपती बाप्पाच्या सणात आणखी भर पडते.