ठाणे खाडी परिसरात फ्लेंमिंगो पक्षांचे आमगन

हिवाळ्यात ठाणे खाडी परिसरात अनेक परदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्यामुळे पक्षीनिरिक्षणाची चांगली संधी पक्षीमित्रांना मिळते. ठाणे खाडी परिसरात फ्लेंमिंगो पक्षांचे आमगम झालंय.  

Updated: Jan 22, 2017, 08:26 AM IST
ठाणे खाडी परिसरात फ्लेंमिंगो पक्षांचे आमगन  title=

ठाणे : हिवाळ्यात ठाणे खाडी परिसरात अनेक परदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्यामुळे पक्षीनिरिक्षणाची चांगली संधी पक्षीमित्रांना मिळते. ठाणे खाडी परिसरात फ्लेंमिंगो पक्षांचे आमगम झालंय.  

ग्रेटर आणि लेसर अशा दोन प्रकारचे फ्लेमिंगो इथं पाहायला मिळतात. आफ्रिका, युरोप आणि आशियातील खंडातील विविध पक्षी या खाडीत तळ ठोकून असतात. हिवाळा पावसाळा आणि उन्हाळ्यात देखील अनेक पक्षी मुक्कामाला असतात. 

फ्लेमिंगो पक्षाबरोबर सीगल्स, रानबदकं, सँडपायपर, पेन्टेड स्टार्क, स्पुन बिल सारख्या मनोहारी पक्षांसाठी निवारा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे खाडीत तब्बल दोनशेहून अधिक प्रकारचे पक्ष्यांची नोंद करण्यात आलीय. ठाण्यात आलेल्या या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी ठाणेकरांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांचं देखील आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला.