...या लग्नात तब्बल ९० बेघर लोकांना मिळाली हक्काची घरं

औरंगाबादच्या लासूरमध्ये एक वेगळंच लग्न पाहायला मिळालं... एका पित्यानं आपल्या मुलीच्या लग्नात चक्क ९० बेघर लोकांना 'घरं' गिफ्ट केले.

Updated: Dec 15, 2016, 02:30 PM IST
...या लग्नात तब्बल ९० बेघर लोकांना मिळाली हक्काची घरं title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या लासूरमध्ये एक वेगळंच लग्न पाहायला मिळालं... एका पित्यानं आपल्या मुलीच्या लग्नात चक्क ९० बेघर लोकांना 'घरं' गिफ्ट केले.

अजय मुनोत हे व्यापारी आहेत. त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नातला वायफळ खर्च टाळून काहीतरी भरीव काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे, त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात गरिबांना घरं मोफत देण्याचा निर्णय घेतला. 

अजय मुनोत हे कपड्याचे आणि धान्याचे व्यापारी आहेत... याशिवाय त्यांचे अनेक उद्योगधंदे आहेत. लासूरमध्ये त्यांच्याकडे ६० एकर जमीनही आहे.

९० लोकांसाठी तब्बल दोन महिन्यांमध्ये एक कॉलनी बनवण्यात आली. यासाठी जवळपास दीड करोड रुपयांचा खर्च आला.