ख्रिसमस, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन : पोलिसांचे आदेश धाब्यावर

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात टायगर आणि लायन्स पॉईंटवर संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत. मात्र पोलिसांचे आदेश तरुणांनी धाब्यावर बसल्याचं चित्र दिसले.

Updated: Dec 25, 2015, 10:07 PM IST
ख्रिसमस, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन : पोलिसांचे आदेश धाब्यावर  title=

खंडाळा : ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात टायगर आणि लायन्स पॉईंटवर संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत. मात्र पोलिसांचे आदेश तरुणांनी धाब्यावर बसल्याचं चित्र दिसले.

सेलिब्रेशनच्या नावाखाली या तरुणांनी दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातला. टायगर आणि लॉयन्स पाईंट संध्याकाळी सातनंतर बंद करणार असं पोलिसांनी कालच जाहीर केलं. पण पोलिसांच्या या आदेशाला पहिल्याच दिवशी पर्यटकांनी हरताळ फासल्याचे दिसले. 

तरुणांचा हा धिंगाणा झी २४ तासच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. विना परवाना दारुची वाहतूक करणा-यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय. शहरातील सर्व मुख्य चौकात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. शहरात येणा-या सर्व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस चेकपोस्ट उभे केलेत. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. पोलिसांच्या या आदेशाला हरताळ फासण्यात आलाय.