चंद्रशेखर भुयार, उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका 'एलबीटी'चा २०० करोड रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. या गैरव्यवहार प्रकरणी १६ कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्यात आलंय.
नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्त मनोहर हिरे यांनी आज कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केलीय.
उल्हासनगर महानगरपालिकेत २०१२ पासून जकातीऐवजी एलबीटी करप्रणाली लागू करण्यात आली होती. जकातीच्या तुलनेत गेल्या तीन वर्षाच्या कालखंडात एलबीटीच्या उत्पन्नात घट झाली. जवळ-जवळ २०० करोड रुपयांचा गैरव्यवहार या विभागात झाल्याचा आरोप मनसे, शिवसेना नेत्यांनी केला होता.
हे प्रकरण नगरविकास खात्यापर्यंत गेल्यानंतर या प्रकरणी १९ ऑगस्ट रोजी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आज दुपारी आयुक्त मनोहर हिरे यांनी एलबीटी विभागातील १६ कर्मचारी निलंबित केले आहेत.
अनिल खतुरणी, राजू पिंजानी, अशोक चांदवानी, डी डी पंजाबी, उद्धव लुल्ला, कमल रेलवानी, राम आयलानी, नरेश जेसवानी, चंदू साधवानी, महेद्र पंजाबी, अनिल तलरेजा, बलराम गिदवानी, संतोष राठोड, शंकर सोहेजा अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
सबंधित दोषी कर्मचाऱ्यांचे पगार बंद झाला पाहिजे, तसेच यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या प्रकरणात पाठपुरावठा करणारे तक्रारदार सचिन कदम यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.