औरंगाबाद : शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली. शिवसेनेवर टीका करणार नाही, असं भाजपकडून वारंवार सांगण्यात आले. मात्र, भाजपचे नेते अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका करीत आहेत. त्याचाच प्रत्यय सिल्लोडमधील अमित शहांच्या सभेत आलाय. शहांनी महात्मा गांधी, वाघ, उंदीर यांची गोष्ट सांगितली. यावेळी ज्या उंदराला वाघ बनविले तोच म्हणतोय तुम्हाला खाईन. मात्र, तो उंदीर आहे, हे विसरतोय, असं सांगत शिवसेनेला अप्रत्यक्ष लक्ष्य केलं.
महाराष्ट्रात शिवसेनेमुळे भाजप मोठा झाला, असं सांगत शिवसेना नेते सांगत आहे. मात्र, याला भाजपने गोष्टीतून प्रत्युत्तर दिलेय. उंदराला वाघ बनविले, तोच उंदीर खाण्याच्या गोष्टी करतो, असे अमित शहांनी म्हटले. भाजप शिवसेनेला चिमटे काढण्याची एकही संधी प्रचाराच्या रणधुमाळीत सोडत नाही. आज सिल्लोडमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर सभेत बोलतना शिवसेनेवर नाव न घेता टीका केली. उंदीराचा कसा वाघ होतो आणि मग तोच समोरच्याला खायला उठतो असा असा अप्रत्यक्ष टोला अमित शाह यांनी या सभेत लगावला.
पाकिस्तान सैन्याकडून गोळीबार करण्यात येत आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याऐवजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप पक्षाचा प्रचार करीत आहेत. मोदी गुजरातचे की देशाचे अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मोदींना विरोधकांनी चौहोबाजुने घेरल्याने भाजपचे नेते आता आक्रमक प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. महात्मा, वाघ आणि उंदीर अशी गोष्ट सांगत जो उंदीर आहे. त्याला वाघ बनविले. तोच खाण्याची गोष्ट करतो, त्या उंदरांना जागा दाखवा, असं सांगत अमित शहा यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.
दरम्यान, याच सभेत अमित शहा यांनी सभेच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण न करता सभा संपल्यावर जाता जाता महाराजांच्या पुतळ्याला हार घातला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.