मुंबई : अभिनेता आमीर खान यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. विधानसभेचं मतदान 15 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी आमीर खान मुंबईत नसून अमेरिकेत असणार आहे.
आमीर खान हा निवडणूक आयोगाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. अनेक जाहिरातींमधून आमीरने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
आमीर खान यावर म्हणतो, मी आपल्या आधीच आखलेल्या दौऱ्यामुळे अमेरिकेत असेल, मी दुख्खी आणि मजबूर आहे.
सामाजिक मुद्यावर आधारीत असलेला टीव्ही शो सत्यमेव जयतेचा दुसरा भाग, पाच ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.