आता यो यो हनी सिंह म्हणणार, 'आता माझी सटकली'!

यो यो हनी सिंह अजय देवगन, करिना कपूर आणि रोहित शेट्टीच्या टीमसोबत पहिल्यांदा आपला जलवा दाखवणार आहे. विशेष म्हणजे हनी सिंह 'सिंघम रिटर्न्स'चं प्रमोशनल साँग तयार करणार आहे. 

Updated: Jul 28, 2014, 09:36 AM IST
आता यो यो हनी सिंह म्हणणार, 'आता माझी सटकली'! title=

मुंबई: यो यो हनी सिंह अजय देवगन, करिना कपूर आणि रोहित शेट्टीच्या टीमसोबत पहिल्यांदा आपला जलवा दाखवणार आहे. विशेष म्हणजे हनी सिंह 'सिंघम रिटर्न्स'चं प्रमोशनल साँग तयार करणार आहे. 

यापूर्वी हनी सिंहनं अजय देवगनचा चित्रपट 'सन ऑफ सरदार'चं गाणं मिका सिंह सोबत गायलं होतं. त्याला संगीत हिमेश रेशमियानं दिलं होतं. मात्र हे पहिल्यांदाच आहे की, हनी सिंह अजय आणि करिना सोबत दिसेल. एवढंच नव्हे तर तो सिंघमचा फेमस डायलॉग 'आता माझी सटकली'ही म्हणणार आहे.
 
हनीचं रोहित शेट्टीसोबत चांगलं ट्यूनिंग आहे आणि रोहितच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये त्याचं लुंगी डांस हे गाणं खूप हिट झालं होतं. हे प्रमोशनल साँग तीन दिवसात 100 मुलांसोबत मोठ्या प्रमाणात शूट करण्यात आलं. याला गणेश आचार्य़नं कोरिओग्राफ केलंय. या गाण्यासाठी गोरेगाव फिल्म सिटीत दोन मोठे फ्लोर्स तयार केले गेले होते. ही तिकडी मोठ्या पडद्यावर धमाल करेल, अशी अपेक्षा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.