मुंबई : शाहरुख खानचा डबल रोल असणारा 'फॅन' नुकताच प्रदर्शित झालाय.
या सिनेमात ५० वर्षीय शाहरुखनं स्टार 'आर्यन' आणि २५ वर्षांचा त्याचा फॅन असलेल्या 'गौरव'ची भूमिका चोख पार पाडलीय.
शाहरुख स्वत: बॉलिवूडचा किंग खान असल्यानं त्याच्यासाठी 'आर्यन' ही भूमिका तेवढी कठिण नव्हती... मात्र, एका तरण्या फॅनची - गौरवची भूमिका त्याच्यासाठी आव्हानात्मक होती.
ही भूमिका त्याच्यासाठी थोडी सोपी केली ती त्याच्या मेकअपनं... उल्लेखनीय म्हणजे, शाहरुखच्या आर्यनच्या भूमिकेपक्षा लोकांना 'गौरव'चं मोठं कौतुकही केलंय.
हॉलिवूडचा मेकअप आर्टिस्ट ग्रेग कॅनॉम यांनी शाहरुखचा हा मेकअप केलाय.