मुंबई : 'शांताबाई' बरीच लोकप्रिय झालीय... आता कुशाल बद्रिके चला हवा येऊ द्यामधून 'खेकडा बाई' लोकप्रिय करणार असं दिसतंय...
आपल्या ‘झिंगाट’ गाण्यांनी सर्वच प्रेक्षकांना ‘याड’ लावणाऱ्या सैराट चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या भन्नाट गाण्यांनी सजलेली आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैराटची टीम पोहोचली थुकरटवाडीमध्ये आणि या मंचावर त्यांनी एकच धम्माल उडवून दिली.
सैराटची चर्चा सध्या सर्वत्र आहेच आणि या चला हवा येऊ द्या च्या या दोन भागांनंतर ती अजुनच वाढणार आहे. येत्या २५ आणि २६ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा. झी मराठीवरून त्याचा आनंद घेता येणार आहे.