अपडेट : सलमान घरी दाखल, चाहत्यांचे मानले आभार

अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने स्थगित केली.

Updated: May 8, 2015, 08:16 PM IST
अपडेट : सलमान घरी दाखल, चाहत्यांचे मानले आभार title=

मुंबई : अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने स्थगित केली. त्याला सत्र न्यायालयाकडून जामीनाची मुदत वाढवून घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शिक्षेला स्थगिती दिली.

 

सायंकाळी ६.५० | सलमानच्या घरासमोर चाहत्यांची प्रचंड गर्दी... सलमाननं आपल्या आई-वडिलांसोबत आपल्या घरातून मानले चाहत्यांचे आभार... शांततेचं केलं आवाहन

सायंकाळी ६.४० | सलमान आपल्या वांद्र्यातील राहत्या घरी दाखल

सायंकाळी ६.०५ | आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून सलमान सेशन कोर्टातून बाहेर पडला. 

सायंकाळी ५.५०| सलमानच्या घरही सलमानच्या स्वागतासाठी तयारी सुरू. नातेवाईकांची आणि मित्र परिवाराची सलमानला भेटण्यासाठी रिघ सुरू... 

सायंकाळी ५.४५ | सलमान खान डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्या कोर्टासमोर शरण आला. रोख जामीन भरल्याची दिली माहिती... रजिस्टर ऑफिसमध्ये सही केली... 

सायंकाळी ५.४० | सलमान खानही सेशन कोर्टात दाखल

सायंकाळी ०५.३० । सलमानची बहिण अलविरा सेशन कोर्टात दाखल

 

दुपारी ०१.३० । सलमान जामीन घेण्यासाठी सत्र न्यायालयाकडे रवाना 

दुपारी ०१.११ । गरिबांना न्याय मिळत नाही - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग

दुपारी ०१.०० । सलमान खान खटल्याची अंतिम सुनावणी जुलै महिन्यात होणार

दुपारी १२.५५ । सलमान खानला अंतिम सुनावणी होईलपर्यंत देश सोडून जाण्यावर बंदी

दुपारी १२.५० । सलमान खान खटल्याची पुढील सुनावणी १५ जूनला कोर्टात हजर होण्याचे सांगितले.

Media preview
सलमान जामीन घेण्यासाठी सत्र न्यायालयाकडे रवाना 

दुपारी १२.५० । सलमान खानला त्याचा पासपोर्ट मिळावा, सलमानच्या वकिलांची न्यायलयाकडे मागणी

दुपारी १२.५० । मुक्ताफळे उधळ्यानंतर अभिजीतने मागितली माफी,  रस्त्यावर झोपणा-या गोरगरिबांबाबत मुक्ताफळं उधळणा-या गायक अभिजीतनं आता माफी मागितलीय. मी लोकांच्या भावना दुखावल्यात. मी हात जोडून माफी मागतो असं अभिजीतनं म्हटलंय. 

दुपारी १२.४६ ।  सलमानच्या घरी अभिनेते अनुपम खेर दाखल

https://pbs.twimg.com/media/CEd1ONzVEAAcmw5.jpg:large
 सलमानच्या घरी अभिनेते अनुपम खेर दाखल

दुपारी १२.४५ । ३० हजार रुपयांचा बेल बाँड भऱणार सलमान 

दुपारी १२.४० ।  सलमानच्या घराबाहेर चाहत्यांचा जल्लोष

दुपारी १२.३६ ।  सलमान खानने आधी शरणागती पत्करल्यानंतर जामीन मिळणार

दुपारी १२.३५ ।अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने स्थगित केली. त्याला सत्र न्यायालयाकडून जामीनाची मुदत वाढवून घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शिक्षेला स्थगिती दिली.

दुपारी १२.३५ । सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

दुपारी १२.३० । सलमान खानच्या शिक्षेला स्थगिती

दुपारी १२.३० । सलमान खानच्या शिक्षेला स्थगिती

दुपारी १२.३० ।  सलमान खानने आधी शरणागती पत्करावी, त्यानंतर जामीन देण्याबाबत मागणी करावी : न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय

दुपारी १२.१० ।  सलमान खानने मद्यप्राशन केले होते : सरकारी वकील

दुपारी १२.०८ । कमान खानचे जबाब नोंदविला होता : सरकारी वकील

दुपारी १२.०७ । सलमान खानने अपघातानंतर पळ काढला होता : सरकारी वकील

सकाळी ११.५९ । सरकारी वकिलांचा युक्तीवाद आता सुरु

सकाळी ११.४८ । सलमान खानच्या वकिलांचा युक्तीवाद संपला

सकाळी ११.४६ । सलमान खानच्या चाहत्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न , चाहत्याला रुग्णालयात दाखल केलं

सकाळी ११.४५ । रवींद्र पाटील जबाब देऊ शकत नव्हता, पोलिसांनी जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतला, सलमानचे वकिल अमित देसाई

सकाळी ११.४० । सलमान खान स्वतः गाडी चालवत होता, हे सरकारी पक्षाने सिद्ध केलेले नाही, सलमानचे वकिल अमित देसाई

सकाळी ११.३५ । रवींद्र पाटीलने उलट तपासणीमध्ये सांगितले होते की गाडी घटनास्थळी पोहोचायला ३० मिनिटे लागली तरीही त्याचे म्हणणे होते की गाडी भरधाव होती, अमित देसाई यांचा युक्तीवाद

सकाळी ११.३४ । सरकारी वकीलांना माहिती होतं की अशोक सिंग आणि कमाल खान दोघंही कारमध्ये होते तरीही दोघांची साक्ष झालेली नाही, सलमानच्या वकिलांचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तीवाद

सकाळी ११.३३ । न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी रवींद्र पाटील याची साक्ष बघण्याची केली मागणी

सकाळी ११.३१ । सत्र न्यायालयाकडून महत्वाचे मुद्दे दुर्लक्षित राहिले, सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद

सकाळी ११.२५ । कमाल खानची उलट तपासणी केली नाही, सलमानच्या वकिलांचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तीवाद

सकाळी ११.२१ । सलमानची शिक्षा स्थगित करा, सलमानचा वकिलांची मागणी, ३०४ (२) नव्हे तर ३०४ (१) असा गुन्हा आहे, असा युक्तीवाद सलमानच्या वकिलांनी केला.

सकाळी ११.११ । हायकोर्टाबाहेर सलमान विरोधात प्रोटेस्ट करणा-या बेघर लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळी ११.०८ । सलमान खानच्या जामीनाविरोधात उच्च न्यायालयाच्या परिसरात बेघर रहिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन. सलमानला जामीन देू नका, अशी पोस्टर्स घेऊन अनेक जण कोर्टाबाहेर

सकाळी ११.०५ । सलमानच्या जामिनावर हायकोर्टात सकाळी साडे अकरा वाजता सुनावणी

सकाळी ११.०४ । सरकारी वकील संदीप शिंदे हायकोर्टात पोहोचले

सकाळी ११.०१ । सलमानला जामीन मिळण्याची शक्यता अधिकः आभा सिंग

सकाळी ११.०० । सलमानप्रकरणी सुनावणी सुरु

सकाळी १०.४९ । सलमानचे वकील शिवदे आणि अमित देसाई हायकोर्टात पोहचले

सकाळी १०.४० । सलमानची बहीण अलविरा खान सुनावणीसाठी कोर्टात हजर.

सकाळी १०.३१ । सलमान खानसाठी प्रार्थना, होमहवन

सकाळी १०.३० । सलमान खानने मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या मागण्या  
- मुंबई सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा रद्द करावी.
- माझ्यावर हज़ारो लोकांचा रोज़गार असल्याने मला शिक्षा सुनावल्यास हज़ारों लोकांना बेरोज़गार व्हावं लागेल.
- मी सामाजिक कार्य करत असल्याने मला माफी द्यावी
- मी अनेक रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करत असतो
- माझी शिक्षा रद्द करुन पैशांच्या स्वरुपात दंड भरण्याची सूट मिळावी

 सलमान खान सुनावणी, मुंबई हायकोर्टाकडे लक्ष

मुंबई : बॉलिवूडकरांना दर शुक्रवारी वेध लागतात ते बॉक्स ऑफिसचे. मात्र आज शुक्रवारी बॉलिवूडकरांचं लक्ष असणाराय ते मुंबई हायकोर्टाकडं. 

सलमान खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणाराय. सलमानकडून ए़डव्होकेट हरीश साळवे युक्तीवाद करणार नसून अमित देसाई त्याची बाजू मांडतील.. तर सरकारी वकील म्ह्णून संदीप शिंदे बाजू मांडणार आहेत.

सलमानला हायकोर्टानं दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र ती मुदत आज संपतेय. दरम्यान, सलमानला आज व्यक्तिशः हायकोर्टात उपस्थित राहण्याची गरज असणार नाहीय. सलमानला जामिन मिळण्याची शक्यता जास्त  आहे असं मत ज्येष्ठ वकील आभा सिंह यांनी व्यक्त केलंय. 

सलमानचा जामीन रद्द झाला तर मुंबई पोलीस त्याला घरी जाऊन अटक करू शकतात. किंवा सलमान स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अटक होऊ शकतो. अटक झाल्यास सलमान खानची सर्वप्रथम आर्थर रोड तुरुंगात रवानगी केली जाईल. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय हॉस्पीटलमध्ये नेण्यात येईल. वैद्यकीय चाचणीनंतर त्याला पुन्हा आर्थर रोडमध्ये आणले जाईल व त्यानंतर कोणत्या जेलमध्ये त्याला हलवावे याबाबत अंतिम निर्णय जेल प्रशासन घेईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.