भन्साळींच्या 'पिंग्या'ला पेशव्यांच्या वंशजांचाही विरोध

बाजीराव मस्तानी सिनेमातल्या पिंगा गाण्यावरून जोरदार वाद रंगलाय. या गाण्यावर सिनेरसिकांनी, इतिहास संशोधकांनी आणि खुद्द पेशव्यांचा वंशजांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Updated: Nov 21, 2015, 09:16 PM IST
भन्साळींच्या 'पिंग्या'ला पेशव्यांच्या वंशजांचाही विरोध title=

मुंबई : बाजीराव मस्तानी सिनेमातल्या पिंगा गाण्यावरून जोरदार वाद रंगलाय. या गाण्यावर सिनेरसिकांनी, इतिहास संशोधकांनी आणि खुद्द पेशव्यांचा वंशजांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातील पिंगा गाण्यावरून चांगलाच दंगा सुरू झालाय. सोशल नेटवर्किंग साईट्सवर सिनेरसिकांनी  पिंगावर अक्षरश:  टीकेची झोड उठवलीय. तर आता पेशव्यांच्या वंशजांनी या गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

अधिक वाचा - बाजीराव-मस्तानीचा दुसरा ट्रेलर हिट

पेशव्यांच्या वारसदारांपाठोपाठ इतिहास तज्ज्ञांनीही त्यावर जोरदार आक्षेप घेतलेत. मस्तानी आणि काशीबाईनं एकत्र नृत्य केल्याचा कुठेच पुरावा नसल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतायत.

अधिक वाचा - काशीबाईंच्या 'पिंगा'वरून सोशल मीडियावर वादाचा पिंगा

संजय लीला भन्साळीनं सिनेमॅटिक लिबिर्टीच्या नावाखाली जो 'पिंगा' घातलाय तो पाहता भन्साळीची क्रिएटिव्हिटी संपत आलीय का? असा प्रश्न सिनेरसिकांना पडलाय. कारण, देवदासमधलं पारो-चंद्रमुखीचं 'डोला रे डोला' आणि काशीबाई-मस्तानीचा 'पिंगा' या दोन गाण्यातला फरक सांगणं कठीण झालंय.

 Video_संजय लीला भन्साळीच्या 'पिंगा'चा सोशल मीडियावर दंगा

प्रेक्षकहो, हे गाणं पाहा आणि तुम्हीच काय ते ठरवा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.