मुंबई : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मोदींच्या या निर्णयाला अभिनेता मकरंद अनासपुरेनं पाठिंबा दिला आहे.
मोदीजींचा निर्णय ही भ्रष्टाचार, काळाबजार, दहशतवाद, नक्षलवादाच्या समस्येवर सणसणीत चपराक असल्याचं मत मकरंदनं व्यक्त केलं आहे, तसंच मोदींनी मागितलेला 50 दिवसांचा वेळ आपण त्यांना द्यायला हवा असंही मकरंद म्हणाला आहे.
सिनेमाचं तिकीट काढण्याच्या रांगेमध्ये किंवा हॉटेलमध्ये आपण दोन तास न कुरकुरता उभे असतो. त्यामुळे आता देशासाठी रांगेत उभं राहण्याचा त्रास आपण सहन केला पाहिजे असं आवाहन मकरंद अनासपुरेनं केलं आहे. मकरंद अनासपुरेच्या आवाहनाचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.
मा. मोदीजींचा निर्णय ही भ्रष्टाचार, काळाबजार, दहशतवाद, नक्षलवादाच्या समस्येवर सणसणीत चपराक : मकरंद अनासपुरे @narendramodi@Dev_Fadnavis pic.twitter.com/mzdWpgsbCt
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 20, 2016