फिल्म रिव्ह्यू : हॅपी जर्नीचं जर्नी ठरलं सफल..

Updated: Nov 29, 2014, 10:59 AM IST
फिल्म रिव्ह्यू : हॅपी जर्नीचं जर्नी ठरलं सफल.. title=

 

सिनेमा : हॅपी जर्नी
संगीत : करण कुलकर्णी
दिग्दर्शक : सचिन कुंडलकर
कलाकार :अतुल कुलकर्णी, प्रिया बापट 

एक अत्यंत साधं आयुष्य जगणारा, शांत, व्यवहारी मिडल एज अशा तरुणाची आणि त्याच्या सुपर एक्सायटेड, सुपर एनर्जेटीक, बल्ली, ल्हावली गोड बहीणीची ही कहाणी आहे.. निरंजन आणि जानकी या भाउ बहिणीवर आधारीत हॅपी जर्नी हा सिनेमा आहे..  निरंजन अर्थातच अतुल कुलकर्णीच्या आयुष्यात अचानक एक दिवस एक मोठा ट्वीस्ट येतो, हा ट्वीस्ट आल्यानंतर त्याचं संपुर्ण आयुष्यच बदलुन जातं.. हा ट्वीस्ट नेमका काय आहे? हीच या सिनेमाची खरी गंमत आहे.. अभिनेत्री प्रिया बापटनं साकारलेली जानकी ही व्यक्तीरेखा जेव्हा ख-या अर्थानं  एक बहिण कम फ्रेंड फिलॉसॉफर गाईड  म्हणून  निरंजनच्या आयुष्यात येते, तेव्हा निरंजनचं आयुष्य बहरुन जातं.. कायम व्यवहारी, शांत आणि क्यलक्युलेटीव  असलेल्या निरंजनला एक बहिणरुपी मैत्रीण मिळते.. त्यानंतर काय घडतं अशा काहीशा बॅकग्राउंडवर आधारीत हा सिनेमा आहे.. खरं तर सिनेमाच्या कथेबद्दल मी मुदामून तुम्हाला फार काही सांगणार नाहीये कारण याची खरी गंमत तुम्हाला प्रतियक्ष सिनेमागृहात जाउन पाहिल्यावरच कळेल...

 

अभिनय :

या सिनेमातली प्रमुख व्यक्तरेखा जिनं साकारली आहे, अर्थातच प्रिया बापटसाठी हा सिनेमा तिच्या करीयरचा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे यात काहीच शंका नाही.. कारण प्रियानं या भुमिकेत प्राण ओतलाय हे स्पष्ट दिसून येतं. यातली तिनं साकारलेली जानकी ही व्यक्तिरेखा कदाचित तिच्याचसाठीच लिहिण्यात आलीये की काय?, हे सिनेमा पाहिल्यावर जाणवतं. तिनं यात सुरेख अभिनय केलाय, तिचा लूक असो, तिची अभिनय शैली, तिची डायलॉग डिल्हीवरी या सगळ्या गोष्टींसाठी प्रियाला 10 ऑन 10... अभिनेत्री प्रिया बापटचं जसं व्यक्तीमत्व आहे.. चंचल, बबली त्यामूळे कदाचित ती स्वताह या कॅरेक्टरला खुप रीलेट करत असावी, हे जानकीकडे पाहताना जाणवतं आणि म्हणुनच तिच्यासाठी हे सगळं निभावणं खुप सोपं झालं असावं.. 

 
अतुल कुलकर्णी या नटासाठी काहीही शक्य आहे हे त्यानं पुन्हा या सिनेमाच्या माध्यमातून सिद्ध केलंय.. या सिनेमात त्यानं साकारलेल्या निरंजन ह्या व्यक्तीरेखेच्या खरं तर दोन बाजु आहेत.. आणि त्या दोन्ही बाजू अत्यंत कॉन्ट्रास्ट आहेत. सुरुवाती आपल्याला एक साधा शात, रिझर्वड, व्यव्हारी असा एक 35शी ओलांडलेला तरुण दिसतो तर दुसरीकडे एक फुल ऑफ लाइफ, चीलआऊट करणा-या निरंजनचा एक वेगळा शेड दिसतो.. या दोन्ही शेड्स अतुल कुलकर्णीनं पुर्ण सच्चेपणानं निभावल्यात यात काडी मात्र शंका नाही.

 
दिग्दर्शन:

दिग्दर्शक सचिन कुंडलकरनं हा सिनेमा करताना काहीही तडजोड केली नाहीये हे प्रकरशानं जाणवतं.. मग ते कास्टींगच्या बाबतीत असो, सिनेमाच्या लुक बद्दल असो किंवा हॅपी जर्नीला योग्य ती ट्रीटमेंट देण्याबाबत असेल.. सिनेमाच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. सिनेमातली कथा तशी खुपच सिंपल आहे, पण त्या कथेत विविध रंग भरण्याचे काम दिगदर्शक सचिन कुंडलकर यांनी केलंय आणि हे करण्यात त्यांना नक्कीच यश आलंय. 

 
संगीत

करण कुलकर्णीनं संगीतबद्ध केलेल्या या सिनेमात वेगवेगळ्या मूड्सची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.. फ्रेश सारखं एक अत्यंत फुट टॅपिंग असं गाणं असो, का सांगना? सारखं रोमँटीक गाणं असो किंवा आकाश झाले सारखं अंगाइ गीत असो.. सिनेमातलं प्रत्येक गाणं आणि त्याला देण्यात आलेली ट्रिटमेंट मग तो विडीयोच्या रुपात असुदेत खुपच अप्रतीमरित्या यातल्या प्रत्येक गाण्याची हाताळणी करण्यात आली आहे..

 
स्पेशल अपिअरन्स... 

बहिण भावाच्या या हॅपी जर्नीमध्ये तुम्हाला खुप वेगवेगळे एक्सपरिमेंट्स पहायला मिळतील जे कदाचित या आधी तुम्ही मराठी सिनेमात  पाहिले नसतील.. सिनेमाचं पिक्चरायजेशन ज्या पद्धतीनं करण्यात आलंय ते पाहिल्यानंतर खरंच सिनेमाच्या डी.ओ.पीला हॅट्सऑफ करावसं वाटतं.. एक एक फ्रेम शुट करत असताना त्याला वेगळी ट्रिटमेंट देण्याचं काम सिनेमाचे डी.ओ.पी रंजन यांनी केलंय.. या सगळ्या गोष्टी पाहता मी या सिनेमाला देतेय चार स्टार्स. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.