देवसेना अनेकांना निर्मात्यांना परवडणार नाही

 देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टी जी आई वडीलांच्या आग्रहास्तव सिनेमात आली,  आज ती सर्वात महागडी हिरोईन ठरली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 6, 2017, 06:53 PM IST
देवसेना अनेकांना निर्मात्यांना परवडणार नाही title=

मुंबई : देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टी जी आई वडीलांच्या आग्रहास्तव सिनेमात आली,  आज ती सर्वात महागडी हिरोईन ठरली आहे. अनुष्का शेट्टीने बाहुबलीच्या तगड्या स्टारकास्टमध्ये फार मोठी जबाबदारी पार पाडली.ही दाक्षिणात्य सुंदरी तिच्या सौंदर्याने अनेकांच्या काळजाचा ठाव घेते.

तेलुगू सिनेमा 'सुपर' हा तिचा पहिला वहिला सिनेमा आहे. बाहुबली सिनेमामुळे अनुष्का शेट्टीचे चाहते जगभरात झाले.

अनुष्काचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. सिनेसृष्टीत एंट्री केल्यानंतर तिने तिचे नाव बदलण्यात आले.  मंगलोर येथे अनुष्काचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 रोजी झाला.अनुष्का शेट्टी तिच्या प्रत्येक सिनेमासाठी 2-3 कोटी रुपये मानधन घेते. अनु्ष्का सर्वात जास्त मानधन घेणारी दाक्षिणेतील एकमेव अभिनेत्री आहे. 

अनुष्का दक्षिणेकडील चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेसृष्टीत येण्याची अनुष्काची बिलकुलच इच्छा नव्हती मात्र आई-वडिलांच्या अग्रहास्तव तिने एक ऑडिशन दिले होते.