मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या चाहत्यांना बकरी ईदनिमित्तानं एक अनोखी 'इदी' दिलीय. शाहरुखनं ईदच्या निमित्तानं त्याच्या तिसऱ्या आणि सर्वात लहान अपत्याचा फोटो सोशल वेबसाईटवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय.
शाहरुखनं मुलगा 'अबराम' याच्यासोबतचा आपला एक फोटो ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर थोड्याच वेळात छोट्या 'अबराम'चा हा फोटो व्हायरल झाला.
या फोटोत 48 वर्षीय अभिनेता आपल्या चिमुकल्याच्या हातांचा पापा घेताना दिसतोय. 'अबराम' आपल्या हातातील खेळण्यासोबत खेळताना दंग आहे...
या फोटोसोबत शाहरुखनं ट्विटरवर म्हटलंय 'सगळ्यांना ईद अल अजहाच्या शुभेच्छा... सगळ्यांना जीवनात खूप आनंद मिळावा ही इच्छा... अबरामही तुम्हा सर्वांना शुभेच्छा देत आहे'
शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांचा मुलगा अबराम गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्या जीवनात प्रवेश केला. 'टेस्ट ट्यूब बेबी'च्या प्रयोगाद्वारे अबरामचा जन्म झालाय. याशिवाय, शाहरुख आणि गौरी यांना आर्यन आणि सुहाना ही दोन अपत्यंही आहेत.
Eid Al Adha Mubarak to everyone. May all have the happiness that life has to offer.The littlest one wishes you too. pic.twitter.com/GzaumkwSE3
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 6, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.