मुंबई: अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून अल्पावधीतच लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या 'एआयबी नॉक आऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात गिरगाव कोर्टानं आज कडक कारवाईचे आदेश दिले.
अभिनेत्री दीपिका पदुकोण, चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यासह अन्य १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. आभा सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीच्यावेळी कोर्टानं हे आदेश दिले आहेत.
या कार्यक्रमात अतिशय अश्लिल आणि कमरेखालचे विनोद असून महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत घरात हा कार्यक्रम पाहिलाच जाऊ शकत नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'एआयबी नॉकआऊट' कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेत हा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकीही दिली होती.
दरम्यान, अभिनेता आमीर खाननं या कार्यक्रमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. सर्वांच्या टीकेनंतर आणि वादानंतर ते व्हिडिओ यु-ट्यूबवरून काढून टाकण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.