सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात काय बिनसलं..

 कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात वाद वाढत आहे. याचा थेट परिणाम द कपिन शर्मा शो वर पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनील ग्रोवरनंतर आता चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनीही शोवर बॉयकॉट टाकला आहे. आता कपिलला किकू शारदा आणि नवज्योतसिंग सिद्धूसोबत शुटिंग करणे भाग पडले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 22, 2017, 09:16 PM IST
सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात काय बिनसलं..

मुंबई :  कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात वाद वाढत आहे. याचा थेट परिणाम द कपिन शर्मा शो वर पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनील ग्रोवरनंतर आता चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनीही शोवर बॉयकॉट टाकला आहे. आता कपिलला किकू शारदा आणि नवज्योतसिंग सिद्धूसोबत शुटिंग करणे भाग पडले. 

डीएनएन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीननुसार कपिलला काही दिवसापूर्वी चंदन, सुनील आणि अली शिवाय शुटिंग करावी लागली. चंदन शोमध्ये चंदू चायवाला तर अली असगर नानीची भूमिका करतात. 

शोसंबधीत एका सूत्रांनी डीएनएला दिलेल्या माहितीनुसार सुनील परत येत नाही. तर अली आणि चंदनने बायकॉट केला आहे. त्यामुळे आता कपिलसोबत कीकू शारदा आणि नवज्योत सिंग सिद्धू राहिले आहेत. ते शुटिंगला पोहचले होते. 

काय आहे. संपूर्ण  

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मुंबई फ्लाइटमध्ये कपिल शर्माने सुनील ग्रोवरसोबत वाईट वागला होता. तसेच शो मधून बाहेर काढण्याचेही बोलला होता. त्यानंतर कपिलने हा वाद घरगुती असल्याचे सांगितले होते. 
त्यानंतर सुनील ग्रोवरला टॅग करून त्याने माफी पण मागितली होती. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. तसेच त्याने कपिलला लोकांचा सन्मान करण्याचा सल्ला दिला होता.