www.24taas.com, झी मीडिया, रिओ दि जानेरो
ब्राझीलमधल्या रिओ दि जानेरो येथील शिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पगारवाढीच्या मागणीसाठी
तिथल्या पालिका मुख्यालयाबाहेर हजारो शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं होतं. यावेळी सरकारच्या विरोधात शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करून वातावरण तापवलं.
अनेक विद्यार्थी तसेच पालकही शिक्षकांच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. त्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केल्यानं परिस्थिती चिघळळी. आंदोलक शिक्षक तसेच त्यांच्या समर्थकांनी यावेळी दगडफेक आणि जाळपोळ करून आपला राग व्यक्त केला. रागाच्या भरात त्यांनी रिओ दि जानेरोमधील दुकानांच्या काचा फोडल्या. यावेळी आंदोलकांनी बसगाड्यांना आगीही लावल्या.
तोंडावर मास्क लावून निदर्शकांनी जोरदार तोडफोड केल्यानं इथली परिस्थिती हाताबाहेर गेली. संपूर्ण रात्रभर रिओ दि जानेरोच्या रस्त्यांवर हा धुमाकूळ सुरू होता....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.