नवी दिल्ली : स्वीस मशिन नावाने प्रसिद्ध असलेले स्वित्झर्लंडचे गिर्यारोहक उली स्टॅकचा मृत्यू झालाय. स्टॅक ऑक्सिजन व्यतिरिक्त नव्या रस्त्याने माऊंट एव्हरेस्टची चढाई करण्याचा प्रयत्न करत होते. एव्हरेस्टच्या जवल माऊंट नपसे जवळ त्यांचा मृतदेह सापडला.
उली स्टॅक हे नेपाळस्थित पर्वत नुप्त्सेवरून कोसळले. बर्फाच्छित पर्वतावरून १००० मीटर खाली ते पडले असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय. स्टॅक पहिल्याच पहिल्याच कॅम्पपासून दुसऱ्या कॅम्पकडे वाटचाल करत होते. नेपाळच्या अधिकाऱ्यांनी आणि आयोजक कंपनीनं यासंबंधी माहिती दिलीय.
एव्हरेस्टवर चढाईसाठी परवानगी देणाऱ्या नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, कोमोलांगा क्षेत्रात वसंत ऋतूत होणारा हा पहिलाच मृत्यू आहे.
40 वर्षीय स्टॅक यांनी 2012 साली ऑक्सिजन व्यतिरिक्त माऊंट एव्हरेस्टची चढाई केली होती.