काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे; छोटा राजनचा दावा

मुंबई पोलिसांकडून माझा अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप कुख्यात गँगस्टर छोटा राजननं केलाय. त्याप्रमाणे मुंबई पोलिसांमधील काही जणांचे लागेबांधे दाऊदबरोबर आहेत... काही पोलीस अधिकारी दाऊदसाठीच काम करतात, असा गौप्यफोस्टही त्यानं केलाय. 

Updated: Nov 3, 2015, 02:21 PM IST
काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे; छोटा राजनचा दावा title=

मुंबई : मुंबई पोलिसांकडून माझा अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप कुख्यात गँगस्टर छोटा राजननं केलाय. त्याप्रमाणे मुंबई पोलिसांमधील काही जणांचे लागेबांधे दाऊदबरोबर आहेत... काही पोलीस अधिकारी दाऊदसाठीच काम करतात, असा गौप्यफोस्टही त्यानं केलाय. 

अधिक वाचा - छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ

आणखी वाचा - काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती

इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक झालेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलीस, मुंबई पोलीस आणि सीबीआय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली टीम इंडोनेशियात राजनला ताब्यात घेण्यासाठी दाखल झाली आहे. या टीमने राजनची जेलमध्ये भेट घेतली. राजनविरोधात भारतमध्ये तब्बल ७० गुन्हे दाखल आहेत. 

अधिक वाचा - मरेपर्यंत दहशतवादाविरोधात लढणार - छोटा राजन

'मी गेल्या अनेक वर्षांपासून दाऊदविरोधी लढा देतोय... मला केंद्रसरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे' अशी याचिकाही छोटा राजननं केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.