आर्थिक व्यवहार करताना या देशांवर अमेरिकेची नजर

अमेरिकेसोबत व्यावसायिक भागीदारी असणाऱ्या सहा मोठ्या देशांवर आता ट्रम्प सरकार कडक नजर ठेवणार आहे. या देशांसोबत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरही सरकारची नजर असणार आहे.

Intern Intern | Updated: Apr 15, 2017, 02:46 PM IST
आर्थिक व्यवहार करताना या देशांवर अमेरिकेची नजर title=

वॉशिंग्टन : अमेरिकेसोबत व्यावसायिक भागीदारी असणाऱ्या सहा मोठ्या देशांवर आता ट्रम्प सरकार कडक नजर ठेवणार आहे. या देशांसोबत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरही सरकारची नजर असणार आहे.

वित्त मंत्रालयाने तयार केलेल्या देखरेख यादीमध्ये चीन, जर्मनी, जपान, कोरिया, स्विझरलॅंड आणि ताइवान या देशांची नावे आहेत.

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने काढलेल्या निष्कर्षावरुन २०१६ च्या उत्तरार्धात झालेल्या आर्थिक फेरबदल बैठकीमध्ये मांडलेले नियम कोणताही मोठा व्यापारी देश पाळत नाही. त्यानूसार मंत्रालयाने व्यावसायीक भागीदारी असणाऱ्या मोठ्या देशांची देखरेख यादी तयार केली आहे. या यादीनुसार सरकार या देशांसोबत आर्थिक व्यवहार करताना नजर ठेवून असणार आहे.