लंडन : जागतिक माध्यम-सम्राट रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच न्यूज कॉर्पोरेशन कंपनीच्या टाइम्स न्यूजपेपरमध्ये बर्थ, मॅरेज आणि डेथ सेक्शनमध्ये केली.
८५ वर्षे वय असलेले मरडॉक ५९ वर्षांच्या सुपरमॉडेल असलेल्या जेरी हॉल यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. जेरी यांचे हे पहिलेच लग्न असले तरी त्यांचे गायक मिक जेंगरसोबत अनेक वर्ष संबंध राहिले आहेत. त्यातून त्यांना चार अपत्येही आहेत.
२०१३ मध्ये वेंडी डेंगसोबत मरडॉक यांचे तिसरे लग्न तुटले होते. गेले काही महिने मरडॉक आणि जेरी एकत्र राहत असल्याच्या चर्चाही होत्या. ऑक्टोबर महिन्यात एका क्रिकेट सामन्याच्या वेळीही ते एकत्र दिेसले होते.
मरडॉक हे 'ग्लोबल मीडिया कंपनी न्यूज कॉर्पोरेशन' ह्या जगातील दोन क्रमांकाच्या मिडीया कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ आहेत. विविध कारणांनी ते कायमच चर्चेत राहिले आहेत.