काबूल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये सकाळी सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसमध्ये स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात २० जण ठार झाल्याची माहिती मिळालीये. तर अनेक जण जखमी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, बसमध्ये दोन स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. स्फोटातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय. ही बस सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात घेऊन जात होती. या स्फोटाबाबत लगेच काही सांगू शकत नाही. दरम्यान, हा आत्मघाती स्फोट असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय, असे एका पोलीस अधिकाऱ्याने यावेळी सांगितले.
सहा जूनपासून रमजान सुरु झाल्यानंतर काबूलमध्ये झालेला हा पहिला हल्ला आहे. याआधी ५ जून रोजी अफगाणिस्तानच्या लोगार प्रांतातील एका न्यायालयात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात ठार तर १९ जखमी झाले होते.