www.24taas.com, बगदाद
इराकच्या एका न्यायालयाने देशाचे फरार उपराष्ट्रपती तारिक अल हाशेमी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.शिया मुस्लिम आणि सुरक्षा दलास लक्ष्य करून लोकांची हत्या करणारे एक पथक चालविल्याप्रकरणी न्यायालयाने हाशेमी यांना दोषी ठरविले आहे.
सुन्नी संप्रदायाशी संबंधित अल हाशेमी या वर्षीच्या सुरूवातील देश सोडून फरार झाले असून ते आता तुर्कीत निर्वासित म्हणून राहत आहेत.याप्रकरणी देशातील शिया, सुन्नी आणि कुर्द आघाडी सरकार समोर एक राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
तर दुसऱ्या एका घटनेत इराकमध्ये ठिकठिकाणी झालेल्या २०हून अधिक दहशतवादी हल्ल्यांमध्ये ५६ ठार तर २५०हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये दोन सुरक्षा अधिका-यांसह ११सैनिकांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी विशेषत: सुरक्षा दले आणि बाजारपेठांना लक्ष्य केले.
रविवारच्या या घटनेमुळे या महिन्यात आतापर्यंत झालेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या ८६ झाली आहे. हा हल्ला आतापर्यंतच्या सर्वात भयानक हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे.