फिजी संसदेत मोदींचं भाषण, तीन करारांवर स्वाक्षऱ्या

फिजीच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशांत महासागरातल्या या छोटेखानी देशासोबत अनेक करार केलेत. यात प्रामुख्यानं संयुक्त ऊर्जा प्रकल्पासाठी ७५ दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाचा समावेश आहे.

PTI | Updated: Nov 19, 2014, 10:23 AM IST
फिजी संसदेत मोदींचं भाषण, तीन करारांवर स्वाक्षऱ्या  title=

फिजी: फिजीच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशांत महासागरातल्या या छोटेखानी देशासोबत अनेक करार केलेत. यात प्रामुख्यानं संयुक्त ऊर्जा प्रकल्पासाठी ७५ दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाचा समावेश आहे.

फिजीमधल्या साखर उद्योगाला चालना, ग्रामविकास तसंच संरक्षणात सहकार्य वाढवण्याबाबतही यावेळी करार करण्यात आले. फिजीचे पंतप्रधान फ्रँक बईमारामा यांच्यासह द्विपक्षीय चर्चेत या करारांना पंतप्रधानांनी अंतिम रुप दिलं. 

In my meeting with Prime Minister Bainimarama, we discussed ways to expand the partnership between India & Fiji. pic.twitter.com/Almt8I4suO

— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2014

 

फिजीच्या नागरिकांना भारतात व्हिसा ऑन अरायव्हल, पार्लमेंट लायब्ररीला सहकार्य आणि भारतात येणाऱ्या फिजीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दुप्पट वाढ करण्याची घोषणाही मोदी यांनी यावेळी केली. मोदी यांनी यावेळी फिजीच्या संसदेलाही संबोधित केलं. 

Addressing the Parliament of Fiji earlier today. pic.twitter.com/abzF3NGIGk

— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2014

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे – 

> भारत आणि फिजीमध्ये तीन करारांवा स्वाक्षऱ्या
> फिजीच्या संसदेत मोदींचे भाषण, लोकशाही हा दोन्ही देशांना जोडणारा महत्त्वाचा दुवा - मोदी
> पवनउर्जा आणि सौरउर्जा या क्षेत्रांमध्ये भारत आणि फिजी एकत्र येऊन काम करु शकतात - मोदी
> फिजीमधील लघु आणि ग्रामोद्योगासाठी भारत ५० लाख डॉलर्स देणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी 
> भारत फिजी सोबत व्यवहार करण्यास उत्सुक - पंतप्रधान मोदी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.