...हा फोटो नेपाळचा नाही, तर ही आहे यामागची खरी कहाणी!

...याच दरम्यान, एका चिमुकल्याचा आणि त्याला घट्ट बिलगून बसलेल्या त्याच्या बहिणीचा फोटोही वायरल झाला.

Updated: May 6, 2015, 08:29 PM IST


हाच तो फोटो

नवी दिल्ली : 25 एप्रिल रोजी आलेल्या नैसर्गिक संकटानं नेपाळच्या राजधानीसहीत अनेक मोठ्या शहरांना हादरवून टाकलं... या भूकंपानं अनेक शहरांना गिळून टाकलं. याची चर्चा सोशल मीडियात न झाली तरच नवल... 

याच दरम्यान, एका चिमुकल्याचा आणि त्याला घट्ट बिलगून बसलेल्या त्याच्या बहिणीचा फोटोही वायरल झाला. नेपाळच्या भूकंपग्रस्त भागातील असल्याचं सांगत सोशल मीडिया तसंच व्हॉटसअपवर हा फोटो खूप फिरला... 

यानंतर, या पीडित भाऊ-बहिणींना शोधण्याचा प्रयत्न केला गेला... इतकंच काय तर त्यांच्या नावावर निधीही गोळा केला गेला. पण, जेव्हा या फोटोचं सत्य उघड झालं तेव्हा अनेकांना झटका लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो एक दशकापूर्वीचा आहे... उत्तर व्हिएतनाममध्ये हा फोटो ना सॉन गुएन या फोटोग्राफरनं काढला होता. 

गुएनच्या म्हणण्यानुसार, 2007 साली हा फोटो कैन ताई गावात काढला होता. या गावातून जात असताना आपली नजर या दोन चिमुकल्यांवर पडली. या दोघांचे आई वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते... आणि हे चिमुरडे आपल्या अंगणात खेळत होते. परंतु, तिथून कुण्या अनोळख्या व्यक्तीला घाबरून लहान मुलगी रडू लागली आणि आपल्या भावाला जाऊन बिलगली... त्यानंतर भावानं तिला घट्ट धरून शांत केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.