ओटावा : कॅनडाच्या माजी उप पंतप्रधान शीला कॉप्स यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. कॉप्स यांच्या पक्षाच्या दोन खासदारांनी त्यांच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप कॉप्स यांनी केला आहे.
या खुलाशानंतर पक्षाने त्या दोन खासदारांना बरखास्त केले आहे. माजी उप पंतप्रधानसोबत बलात्कार प्रकरणी लैंगिक छळाबाबत एका कार्यक्रमात नागरिकांना याबाबत माहिती मिळाली. कॉप्सने एका वर्तमानपत्रात कॉल लिहिला की २८ वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांच्या पक्षाच्या दोन खासदारांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता.
कॉप्स १९९३ ते १९९७ पर्यंत कॅनडाच्या उप पंतप्रधान होत्या. त्यांनी सांगितले की, महिलांविरोधात लैंगिक छळासंदर्भात असलेला दौऱ्यात हा बलात्कार करण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.