अमेरिकेनं दिले होते भाजपच्या हेरगिरीचे आदेश

भारताचा प्रमुख राजकीय पक्ष भाजपसह जगातील सहा प्रमुख पक्षांवर पाळत ठेवण्याचा परवाना अमेरिकेन कोर्टानं २०१० साली नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला (एनएसए) दिल्याचा गौप्यस्फोट ‘दि वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रानं केलाय.

PTI | Updated: Jul 2, 2014, 10:16 AM IST
अमेरिकेनं दिले होते भाजपच्या हेरगिरीचे आदेश   title=

वॉशिंग्टन: भारताचा प्रमुख राजकीय पक्ष भाजपसह जगातील सहा प्रमुख पक्षांवर पाळत ठेवण्याचा परवाना अमेरिकेन कोर्टानं २०१० साली नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला (एनएसए) दिल्याचा गौप्यस्फोट ‘दि वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रानं केलाय.

२०१०मध्ये एनएसएला हेरगिरीसाठी देण्यात आलेल्या जगभरातील राजकीय पक्षांच्या यादीत भारतीय जनता पक्षासह इजिप्तचा मुस्लिम ब्रदरहूड, इजिप्शियन नॅशनल सॅलव्हेशन फ्रंट, लेबेनॉनचा अमाल, बोलिव्हियाचा कॉण्टिनेन्टल, व्हेनेझुएलाचा को-ऑर्डीनेटर आणि पाकिस्तानची पाकिस्तानी पिपल्स पार्टी यांचा समावेश होता. या वृत्तासोबतच या वृत्तपत्रानं यासंदर्भातील अनेक कागदपत्रंही उघड केली आहेत.

ओबामांवर रोख 

गुप्तचर संस्था देशांच्या अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार काम करतात आणि इतर देशांची माहिती मिळवतात, असं ‘एनएसए’च्या प्रवक्त्या व्हानी व्हिनेस यांनी म्हटलंय. त्यामुळं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मर्जीनंच अमेरिकेची हेरगिरी सुरू होती हे स्पष्ट होतं.  

१९३ देशांवरही पाळत

‘वॉशिंग्टन पोस्ट’नं केलेल्या गौप्यस्फोटानुसार भारतासह १९३ देशांचे सरकार आणि प्रमुख नागरिकांवर पाळत ठेवण्याची परवानगी अमेरिकेच्या विदेशी गुप्तचर पाळत कोर्टानं एनएसएला दिली होती. एनएसएनं हिंदुस्थानातील व्हीआयपींवर नजर ठेवून महत्त्वपूर्ण परराष्ट्रविषयक गुप्त माहितीही गोळा केल्याचं या गुप्तचर संघटनेचा माजी गुप्तचर एडवर्ड स्नोडेन यानंही स्पष्ट केलंय.

“अमेरिकन गुप्तचर संघटना जगभरातील विशिष्ट देशांवर पाळत ठेवून राष्ट्रीय गुप्तचर संचालक आणि विविध विभागांसाठी आवश्यक गुप्त माहिती गोळा करतात, त्यात आश्च्र्य वाटण्यासारखे काही नाही. एनएसएनं ठेवलेली पाळत ही अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यां च्या आदेशावरूनच होती” - व्हानी व्हिनेस, एनएसएच्या प्रवक्त्या

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.