बीजिंग : चीनच्या दक्षिण गुआंग्दोंग प्रांतात पॉर्न फिल्म आणि झुगारावर केलेल्या कारवाई दरम्यान जवळपास ३०,००० हून अधिक संशयित व्यक्तींना अटक करण्यात आलीय.
गेले दोन महिने ही कारवाई सुरू होती. गुआंग्दोंग प्रांतातील जनसुरक्षा विभागानं दिलेल्या माहितीनुसार, प्रांतात केल्या गेलेल्या कारवाईत ३,०१४ जणांना अटक करण्यात आलीय तर ५००० हून अधिक संशयितांवर नजर ठेवण्यात आलीय.
एका प्रकरणात, पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी हुजिहोऊ शहारता एका ऑनलाईन जुगाराचा भांडाफोड केलाय. चीनी सरकारी समाचार एजन्सी असलेल्या 'शिन्हुआ'नं दिलेल्या बातमीनुसार, झुगाराच्या प्रकरणांत जवळपास तीन करोड युआन (५० लाख अमेरिकन डॉलर) इतकी रक्कम पकडण्यात आलीय.
पोलिसांच्या माहितीनुसार, अवैध प्रकरणांना आळा घालण्यासाठी ही कारवाई सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.