भारताशी वैर नाही- श्रीलंका

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमध्ये श्रीलंकेविरोधात अमेरिकी प्रस्तावाचं भारताने समर्थन केलं असलं, तरीही भारताशी आमचे संबंध चांगलेच आहेत, असं स्पष्टीकरण श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री जी. एस पिरीस यांनी दिलं आहे

Updated: Apr 5, 2012, 03:58 PM IST

www.24taas.com, कोलंबो

 

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमध्ये श्रीलंकेविरोधात अमेरिकी प्रस्तावाचं भारताने समर्थन केलं असलं, तरीही भारताशी आमचे संबंध चांगलेच आहेत, असं स्पष्टीकरण श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री जी. एस पिरीस यांनी दिलं आहे.

 

संसदेत विरोधकांनी भारतीयांशी संबंध बिघडत चालले आहेत असा आरोप केल्यावर पिरीस म्हणाले, भारताशी कुठल्याही प्रकारचं वैर नाही. कुठलेही द्विपक्षिय संबंध हे एकतर्फी असू शकत नाही. जे काही झालं, ते विसरून आपल्याला पुढे जायला हवं.

 

याच महिन्यात भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली सर्वदलीय भारतीय संसदेचं प्रतिनिधी मंडळ श्रीलंका यात्रेसाठी येणार आहे. पण, अमेरिकेला श्रीलंकेविरुद्ध पाठिंबा देताना भारताच्या निती व्यवस्थेत उडालेला गोंधळ आता स्पष्ट झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.