आजपासून काय स्वस्त, काय महाग : बँक खातेदार, करदात्यांसाठी काय नवीन?

ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात आजपासून होत आहे. १ एप्रिल अनेक नवीन गोष्टी बऱ्या वाईट आहेत. आजपासून काय स्वस्त होणार आणि महाग होणार, टॅक्समध्ये सुटसुटीतपणा तर पैसे ठेवी व्याज दरात कपात  होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2017, 09:06 AM IST
आजपासून काय स्वस्त, काय महाग : बँक खातेदार, करदात्यांसाठी काय नवीन? title=

नवी दिल्ली : ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात आजपासून होत आहे. १ एप्रिल अनेक नवीन गोष्टी बऱ्या वाईट आहेत. आजपासून काय स्वस्त होणार आणि महाग होणार, टॅक्समध्ये सुटसुटीतपणा तर पैसे ठेवी व्याज दरात कपात  होणार आहे.

आजपासून स्वस्त

- रेल्वे तिकीट
- घर खरेदी
- मध्यमवर्गीयांना करात सवलत
- लेदर सामान
- नैसर्गिक गॅस
- निकल, बायोगॅस
- नायलॉन
- सौरऊर्जा बॅटरी व पॅनल
- पवन चक्की
- भूमी अधिग्रहणाची नुकसानभरपाई होणार करमुक्त

काय झाले महाग?

- मुंबई - पुणे एक्स्प्रेस टोल, 18 टक्के दरवाढ
- पानमसाला, गुटखा उत्पादन शुल्क १० वरून १२ टक्के होणार 
- सिगारेटवरील उत्पादन शुल्क प्रति हजार २१५ वरून ३११ रुपये होणार 
- वाहनांचा विमा महाग होणार असून विमा दरात ५० टक्क्यांची वाढ अपेक्षित 

बॅंकांचे विलीनिकरण

स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक पतियाळा आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बॅंका स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन होणार आहेत.

या सर्व बँकांनी आपल्या शाखांबाहेरील नामफलकांत अपेक्षित बदल पुढील कामकाज दिवस म्हणजे सोमवार ३ एप्रिलपर्यंत बदलण्याची प्रक्रिया बहुतांश पूर्ण केली जाईल. त्या त्या बँकांच्या खातेदारांचे आठवडय़ाभरात स्टेट बँकेत संक्रमणाची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

टॅक्सधारकांसाठी...

नवीन सोप्या आणि फक्त एक पानी विवरणपत्राचा नमुना अधिसूचित केला. सरकारच्या नव्या नियमानुसार या विवरणपत्रावर आधार क्रमांकाची नोंद सक्तीची करण्यात आली आहे. 

पगारदार करदात्यांसाठी ‘आयटीआर-१ सहज’ हा विवरणपत्र दाखल करण्याचा नवीन अर्ज नमुना हा आजवर प्रचलित सात पानी अर्जाची जागा घेईल. नवीन अर्ज नमुना हा वेतनाद्वारे, घर मालमत्ता अथवा व्याजापोटी वार्षिक ५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तिगत करदात्यांसाठी आहे. 

व्याज दरात कपात

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकासपत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पोस्टाच्या मुदत व आवर्ती ठेव योजना आदी नऊ  योजनांवरील व्याज दरात सरकारने एक दशांश (०.१) टक्क्यांची कपात केली आहे.