दिल्लीत दोन तरुणींचा ऑटो ड्रायव्हरवर अत्याचाराचा प्रयत्न

दिल्लीत एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. आतापर्यंत आपण ऑटोचालक, टॅक्सीचालकाचा महिला प्रवाशावर अत्याचार, छेड काढण्याच्या घटना ऐकल्या आहेत. पण दिल्लीत दोन तरुणींनी ऑटो ड्रायव्हरवर अत्याचार करण्याची घटना घडलीय.

Updated: Jul 16, 2015, 02:46 PM IST
दिल्लीत दोन तरुणींचा ऑटो ड्रायव्हरवर अत्याचाराचा प्रयत्न title=

नवी दिल्ली: दिल्लीत एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. आतापर्यंत आपण ऑटोचालक, टॅक्सीचालकाचा महिला प्रवाशावर अत्याचार, छेड काढण्याच्या घटना ऐकल्या आहेत. पण दिल्लीत दोन तरुणींनी ऑटो ड्रायव्हरवर अत्याचार करण्याची घटना घडलीय.

घटना बुधवारी रात्रीची आहे. रात्री 12.30च्या सुमारास ऑटोचालक उमेश प्रसाद यांच्या ऑटोमध्ये सफदरगंज एन्क्लेवला एक भारतीय तरुणी बसली. तरुणीनं साकेतला रिक्षा थांबवला. 300 रुपये तिच्याजवळ नसून ते घ्यायला ऑटोचालकाला वर घरी बोलावलं. 

ऑटोचालक उमेश घरी येताच तिनं दरवाजा बंद केला. तिच्या घरात एक परदेशी महिलाही होती. दोघींनी उमेशला दारू पाजण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत अश्लिल कृत्य करत एक जण एमएमएस काढत होती.   

दरम्यान, घाबरलेल्या उमेशनं पळ काढत गॅलरीतून उडी मारली. त्यामुळं त्याच्या पायाचं हाड मोडलंय. पोलिसांनी याबाबत तक्रार नोंदवून घेतली असून एका महिलेला अटक केलीय. तर दुसरी अजून फरार आहे.  

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.