नवी दिल्ली : लैंगिक शोषण आणि खराब वर्तनाच्या आरोपाखाली भारतीय लष्करातर्फे आफ्रिकेत गेलेल्या दोन शांती सैनिकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणात तिसऱ्या सैनिकावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरू आहे.
दक्षिण सुदान आणि कांगो मध्ये २०१० आणि २०१३ दरम्यान ही प्रकरणे घडली होती. या संदर्भात संयुक्त राष्टाचा एक अहवाल सार्वजनिक करण्यात आला होता. परदेशी जमिनीवर संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेत भारतीय लष्कर या ठिकाणी अधिक आहेत.
२००८ मध्ये भारतीय सैनिकांननी शांती सेना मिशनमध्ये पैसे देऊन सेक्स सेवा घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. यात १० भारतीय सैनिक सामील होते.
तसेच या अहवालात स्पष्ट करण्यात आले की संयुक्त राष्ट्राच्या शांती मिशनमध्ये लैंगिक दुर्व्यवहाराच्या बाबतीत भारतीय सैनिकांची सर्वात कमी संख्या आहे. इतर देशातील सैनिकांची संख्या अधिक आहे. संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार शांती सैनिक वेश्यांना पैसे देऊ सेक्स सेवा घेऊ शकत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.