नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावेळी, त्यांनी आपली पत्नी सुनीता केजरीवाल यांचे आभार मानलेत.
दिल्ली विधानसभेचा निकाल पाहण्यासाठी उत्सुक असलेले सगळेच जण आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दिल्लीच्या पक्ष कार्यालयात एकत्र जमले होते. यावेळी, अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच त्यांची पत्नी सुनीताही उपस्थित होती.
निकाल येणं सुरु झालं आणि प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहचली... निकाल स्पष्ट होताच आपच्या कार्येकर्त्यांनी आनंदानं एकच जल्लोष केला. यावेळी, पक्षाचे नेते कुमार विश्वास यांचा वाढदिवसही केक कापून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. आज कुमार विश्वास यांचा वाढदिवसही आहे.
यावेळी आपला आनंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांसोबत आणि आपल्या पत्नीसोबत साजरा केला. आनंदानं केजरीवाल यांनी पत्नीला उचलूनही घेतलं. आपल्या यशाचं श्रेय त्यांनी पत्नीलाही दिलंय.
Thank u Sunita for always being there "@rsaraf007: Sunita Kejriwal and @ArvindKejriwal first pics after winning pic.twitter.com/eDLxfxKMbd"— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 10, 2015
विजयानंतर जनतेसमोर आलेल्या केजरीवाल यांनी आपल्या पत्नीलाही जनतेसमोर आणलं... आपल्या पत्नीला गर्दीतून समोर बोलावत 'ही माझी पत्नी आहे... ती कधीही समोर आलेली नाही. सरकारमध्ये काम करते म्हणून तिला भीती वाटते की सरकारनं काही कारवाई तर करणार नाही ना... मी आज त्यांना इथं आणलंय की घाबरण्याचं काहीही कारण नाही... कोणतंही सरकार काहीही कारवाई करणार नाही. जर, आज ती नसती तर मी इतकी मेहनत कधीच घेऊ शकलो नसतो' असंही केजरीवाल यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.